रोजगार हमी समितीची प्रमुख कामे

मजुरांची नोंदणी व जॉब कार्ड

  • गावातील ज्या व्यक्तींना अकुशल (कष्टाची) कामे करायची आहेत, अशा कुटुंबांची नोंदणी करणे.

  • नोंदणीकृत कुटुंबांना ‘जॉब कार्ड’ (Job Card) वाटप करणे आणि ते अपडेट ठेवणे.

कामाचे नियोजन

  • ग्रामसभेत चर्चा करून गावासाठी आवश्यक असलेल्या कामांचा वार्षिक कृती आराखडा (Action Plan) तयार करणे.

  • लेबर बजेट (Labour Budget) तयार करून त्याला मंजुरी घेणे.

  • गावातील पाझर तलाव, रस्ते, विहिरी आणि वृक्षलागवड यांसारखी कामे निश्चित करणे.

कामावर देखरेख व सुविधा

  • चालू असलेल्या कामावर पिण्याचे पाणी, आणि प्रथमोपचार पेटी (First Aid Box) या सुविधा आहेत का हे पाहणे.

  • कामाच्या ठिकाणी मजेरी मस्टर (Muster Roll) व्यवस्थित भरले जात आहे ना यावर लक्ष ठेवणे.

सामाजिक अंकेक्षण

  • रोजगार हमीच्या कामात पारदर्शकता राहावी म्हणून वेळोवेळी ‘सोशल ऑडिट’ करणे.

  • ग्रामसभेत कामाचा हिशोब आणि मजुरांना मिळालेली मजुरी याची माहिती वाचून दाखवणे.

वैयक्तिक लाभाच्या योजना

शेतकऱ्यांसाठी सिंचन विहीर, फळबाग लागवड, गोठा बांधणी, आणि शेततळे यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवणे आणि त्यांचे प्रस्ताव मंजूर करून घेणे.

रोजगार हमी समिती पदाधिकारी
क्र.नावपद
१.श्री. संतोष बाबुराव आंबेकरअध्यक्ष
२.श्री. दिपक रामजी खळेसदस्य
३.श्री. शशिकांत हरिश्चंद्र पवारसदस्य
४.श्री. प्रकाश जानू आदावडेसदस्य
५.श्री. लक्ष्मण गणपत गुरवसदस्य
६.सौ. रसिका रमेश खळेसदस्या
७.सौ. संध्या सुनिल बेंडलसदस्या
८.सौ. वंदना प्रभाकर येलवेसदस्या
९.श्रीमती लक्ष्मी भागोजी रामाणेसदस्या
१०.सौ. ऋतुजा मनोहर सणवारेसदस्या
११.कु. नितेश रामचंद्र शिगवण – ग्रामरोजगार सेवकसदस्य
Scroll to Top