आरोग्य समिती — प्रमुख कामे

आरोग्य सेवा

  • गावातील उपकेंद्र / प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) यांच्या कामावर देखरेख ठेवणे

  • गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांना (ANM, आशा, अंगणवाडी सेविका) सहकार्य करणे

  • लसीकरण मोहिमेची आखणी, जनजागृती आणि अंमलबजावणी

  • गर्भवती महिला, नवजात बालक, कुपोषित बालक यांच्या तपासणीस मदत करणे

  • कोविड, डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे

स्वच्छता व पाणीपुरवठा

  • गावात स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करणे

  • पाण्याच्या स्त्रोतांची नियमित तपासणी आणि क्लोरिनेशन

  • कचरा व्यवस्थापन, घन व द्रव कचरा विल्हेवाट योजना राबवणे

  • सार्वजनिक शौचालयांची देखभाल व स्वच्छता राखणे

पोषण आणि जनजागृती

  • अंगणवाडी केंद्रात पोषण आहार वितरणावर देखरेख ठेवणे

  • महिलांच्या व मुलांच्या आरोग्याविषयी जागृती कार्यक्रम आयोजित करणे

  • पोषण सप्ताह, आरोग्य सप्ताह, स्वच्छता सप्ताह इ. साजरे करणे

योजना व निधी व्यवस्थापन

  • ग्रामपंचायतीच्या वार्षिक आरोग्य कृती आराखड्याची आखणी करणे

  • 15वा वित्त आयोग, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांतील निधीचा योग्य वापर करणे

  • गाव आरोग्य योजनेसाठी आरोग्य निधीचा वापर कसा करायचा यावर निर्णय घेणे

आरोग्य समिती पदाधिकारी
क्र.नावपद
१.श्री. संतोष बाबुराव आंबेकरअध्यक्ष
२.श्री. दिपक रामजी खळेसदस्य
३.श्री. शशिकांत हरिश्चंद्र पवारसदस्य
४.श्री. प्रकाश जानू आदावडेसदस्य
५.श्री. लक्ष्मण गणपत गुरवसदस्य
६.सौ. रसिका रमेश खळेसदस्या
७.सौ. संध्या सुनिल बेंडलसदस्या
८.सौ. वंदना प्रभाकर येलवेसदस्या
९.श्रीमती लक्ष्मी भागोजी रामाणेसदस्या
१०.सौ. ऋतुजा मनोहर सणवारेसदस्या
११.श्री. शांताराम शंकर टेमकरसदस्य
१२.डॉ. अजिंक्य विश्वास वैद्य – वैद्यकीय अधिकारीसदस्य
१३.सौ. प्रतीक्षा महेश पवार – आशा सेविकासदस्य
Scroll to Top