आगरवायंगणी गाव

निसर्ग आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा

प्रस्तावना (Introduction) कोकणातील निसर्गरम्य परिसरात, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यापासून १८ कि.मी. अंतरावर प्राचीन काळापासून ‘आगरवायंगणी’ हे गाव वसलेले आहे. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा वारसा सांगणारे हे गाव नैसर्गिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक वसा लाभलेले एक सुसंस्कृत गाव आहे.

नावाचा अर्थ (Etymology) गावाचे नाव भौगोलिक रचनेवरून पडले आहे:

  • आगर: म्हणजे सुपारीच्या बागा.

  • वायंगणी: म्हणजे उन्हाळ्यात बागांना पाणी शिंपण्याची व्यवस्था असलेला भाग. आजही नावाप्रमाणेच हे गाव सुपारी आणि नारळाच्या बागांनी समृद्ध आहे.

सामाजिक रचना आणि सुविधा

  • एकात्मतेचे प्रतीक: गावात कुणबी, मराठा, तेली, गुरव, ब्राह्मण, गवळी आणि बौद्ध अशा विविध जाती-धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.
  • ग्रामसेवा संघ: गावाने एकोप्याने राहावे यासाठी पूर्वजांनी सन १९५१ साली ‘ग्रामसेवा संघ आगरवायंगणी मंडळा’ची स्थापना केली.

  • गावाची रचना: गावात एकूण १२ वाड्या आहेत.

  • उपलब्ध सुविधा: गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी उप-आरोग्य केंद्र, वि. वि. का. सहकारी संस्था, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय, शिधा वाटप केंद्र, कुणबी संस्कृतीक भवन दाभोळ विभाग आणि सरकार सेवा केंद्र उपलब्ध आहेत.

लोकसांख्यिकी आणि सामाजिक स्थिती (२०११ जनगणना)

आगरवायंगणी गावची लोकसंख्या आणि सामाजिक रचना 

९७१.१५ हेक्टर

क्षेत्रफळ

843 घरे

घर संख्या

१०७१

लोकसंख्या

९०%

साक्षरता

खालील सर्व विविधतेमुळे पर्यटनदृष्ट्या महत्वाचे गाव

ऐतिहासिक वारसा

  • गुहागर अंजनवेल येथील गोपाळगडावर शिगवण कुटुंबीय सारंगी वाजवीत असत , खळे कुटुंबीयांचा मान होता , तर तेली समाजाचे लोक तेथे तेल पुरवीत होते.

पर्यटन आणि धार्मिक स्थळे

  • श्री भैरीरवळनाथ मंदिर (ग्रामदेवता): येथे सूर्यनारायण देवरहाटी येथून सूर्य उगवतानाचे विलोभनीय दर्शन होते.

  • श्री शिवेश्वर मंदिर: हे महादेवाचे मंदिर पांडवकालीन आहे.

  • तळीवरील गणपती मंदिर: हे देखील गावातील एक जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान आहे.

  • मुख्य नदीवर काळकाई देवीचे स्थान आहे

संस्कृती आणि लोककला

  • शिमगा उत्सव: यामध्ये खेळी, नकटा, राधेचा खेळ आणि गवळ्याचा डेरा हे प्रकार सुप्रसिद्ध आहेत. होमाच्या वेळी फोपळीचे शीत खेळविण्याची एक वेगळी परंपरा येथे आहे.

  • गणेशोत्सव: जाखडी नृत्य आणि कलगी तुरा हे विशेष आकर्षण असते.

  • लोककला: कलगी तुरा, भजन-कीर्तन आणि ढोल-ताशा या कला आजही जोपासल्या आहेत.

शैक्षणिक प्रगती

  • कै. घोंगडे गुरुजींच्या संकल्पनेतून ‘आगरवायंगणी पंचक्रोशी शिक्षण संस्थे’ची स्थापना झाली.

  • ग्रामस्थांच्या सहकार्यातून सन १९८३ साली ‘बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी हायस्कूल’ सुरू झाले, ज्यामुळे गावातच माध्यमिक शिक्षणाची सोय झाली.

  • इतर संस्था: जि. प. पूर्ण प्राथमिक मराठी डिजिटल केंद्र शाळा, अंगणवाडी आणि सरस्वती वाचनालय संस्कार केंद्र.

अर्थव्यवस्था आणि शेती

  • शेती: प्रामुख्याने भात शेती (खरीप हंगाम), तसेच नारळ आणि सुपारीची लागवड.

  • फळझाडे: आंबा, काजू, फणस आणि कोकम.

  • इतर व्यवसाय: बांधकाम मजुरी आणि नोकरीनिमित्त मुंबई-पुणे शहरांमध्ये स्थलांतरित झालेला वर्ग.

इतर महसुली गावे पहा

Scroll to Top